अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक.

रावेर पोलिसांनी येथील सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अॅल्यूमिनीयमच्या तारासह आठ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे कि, येथील गट नंबर १७८३ मध्ये सोलर प्रोजेक्टरचे काम सुरू आहे. यासाठी भरत कमलाकर महाजन (रा. रावेर) यांनी प्रोजेक्टसाठी आणलेल्या १०० स्क्वेअर एमएम कंडक्टरच्या सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या सहा अॅल्यूमिनीयम तारांचे बंडल चोरीला गेल्याची तक्रार (ता. ८) रावेर पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या पथकाने गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. मुदस्सर शेख बदरुज्जमा शेख (३६, रा. जुनेगाव चाळीत मोहल्ला, मुक्ताईनगर), सय्यद आकीब सय्यद हुसेन (२२, रा. इदगाहनगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेऊ प्राथमिक तपासात या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या अॅल्यूमिनियमच्या तारांसह गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो (एमएच ४३ बीबी ०५८६) गाडी असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. कल्पेश आमोदकर, पो. कॉ. संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विकारुद्दीन शेख, चालक ग्रेड पोउपनि जमिल शेख, पोहेकॉ संतोष ईदा यांनी सक्रिय सहभाग घेऊन कारवाई केली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.