रात्री पत्नीसोबत एकत्र जेवला, बायको भांडी घासायला गेली इतक्यात तरुणाचं घरात टोकाचं पाऊल; जळगावात हळहळ.

जळगावमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी बाहेर असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जळगाव एमआयडीसी परिसरातील जय आनंद दाल मील कंपनीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाचं नाव अजय बुधराम पाटील (वय-२२, रा. एमआयडीसी, जळगाव) असं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवासी असलेला अजय पाटील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पत्नीसोबत एमआयडीसीतील जय आनंद दाल मील कंपनीच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला होता. त्याच कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री १२ जून रोजी अजयने नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केलं. त्यानंतर त्याची पत्नी घराबाहेर भांडी धूत असताना, अजयने घरात जाऊन दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलं.घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली.

त्यांनी अजयला खाली उतरवून तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अजयने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद पाटील हे पुढील तपास करत आहेत. इतक्या तरुण वयात अजयने हे टोकाचं पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.