नांदेडच्या व्यक्तीची जालन्यात बॉडी, बेपत्ता तरुण सापडला अन्…; दोन चिमुकल्यांचं वडिलांचं छत्र हरपलं.

नांदेडहून पुण्याला मित्राकडे जायला निघालेल्या तरुणाची जालना येथे हत्या झाली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. रामेश्वर यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. वडिलांच्या जाण्याने मुलांचं वडिलांचं छत्र हरपलं आहे.पुण्याला मित्राकडे जात आहे असं म्हणून निघालेल्या नांदेडच्या एका वृत्तपत्र विक्रेत्याची जालना येथे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचा गळा आवळून आणि डोक्याला पाठीमागील बाजूस धारदार वस्तूने मारुन त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी जालनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मृताची ओळख पटवून एका मारेकऱ्याला जेरबंद केलं आहे. रामेश्वर उर्फ बाळा दत्तराव पवार (३१) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपीने हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.रामेश्वर पवार हा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून तो वृत्तपत्र विक्रेता होता. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांचा तो लहान भाऊ होता. सोमवार ९ जून रोजी तो पुण्याला जातं आहे असं म्हणून घरातून निघून गेला.

गुरुवारी १२ जून रोजी दुपारी जालन्याहून पवार कुटुंबाला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील कुणी बेपत्ता आहे का अशी विचारणा करुन जालन्यात यावं असा निरोप दिला. त्यानुसार नांदेडहून वृत्तपत्र वितरक बालाजी पवार आणि कुटुंबीय जालन्याला गेले असता त्यांनी तेथील मृताची ओळख पटवली. या हत्येच्या घटनेने पवार कुटुंब हादरलं आहे.याबाबत जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्याचे संतोष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, १० जून रोजी जालना येथे गुरनं ४९६/२५ कलम १०३(१) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अनोळखी मयत इसमाची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु होता.

जालना स्थागुशा पथकाने या घटनेतील मारेकऱ्याचा शोध घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जालना येथील ५८ वर्षीय आबासाहेब विठ्ठलराव घोडके याला ताब्यात घेतलं.चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. तसंच मृत रामेश्वरकडील मोबाईल आणि पैसे आपण चोरण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने प्रतिकार केल्याने आपण त्याचा गळा आवळून आणि लाकडाने मारुन हत्या केली, अशी कबुलीही आरोपी घोडकेने दिली.रामेश्वर पवार हा वृत्तपत्र विकून आपला आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा. त्याला एक सहा आणि तीन वर्षाची अशी दोन मुलं आहेत. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं आहे. या घटनेने पवार कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.