रुग्णवाहिकेअभावी गर्भमृत्यू, मृत अर्भकाची पिशवीतून परतपाठवणी, मोखाडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार शक्य नसल्याने महिलेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. ​​अखेरीस १५ तासांनी रुग्णालयात ती पोहोचली. परंतु तोपर्यंत गर्भातील बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र, तिथेच तिची कहाणी संपली नाही. पहाटे तीनच्या सुमारास तिला प्रसवकळा सुरू झाल्या. रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर पालकांनी दूरध्वनी केला. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही. अखेरीस खासगी वाहनाने तिला खोडाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.तिथे उपचार शक्य नसल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. अखेरीस १५ तासांनी रुग्णालयात ती पोहोचली. परंतु तोपर्यंत गर्भातील बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र, तिथेच तिची कहाणी संपली नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयातून तिला मृत अर्भक पिशवीत घालून मूळ गावी परतावे लागले. ही करुण कहाणी आहे मोखाडा तालुक्यातील जोगलवाडीच्या २६ वर्षीय अविता कवर हिची…अविताला ११ जूनच्या पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. पालकांनी तिला खोडाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र, दूरध्वनी करून रुग्णवाहिका आलीच नाही.

अखेर एका खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे उपचार शक्य नसल्याने अविताला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. परंतु रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याने आसे उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविण्यात आली व संध्याकाळी सहा वाजता अविताला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीदरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शास्त्रक्रिया करत मातेला वाचविण्यात यश आले. मात्र, त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. मृत अर्भक पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनासाठी पैसे नसल्याने अविताचे वडील सखाराम कवर यांनी चक्क मृत अर्भकास पिशवीत भरून तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास बसने केला आणि मूळ गावी येऊन अंत्यसंस्कार केले.लवकर रुग्णवाहिका न मिळाल्याने सखाराम कवर यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना जाब विचारला असता खोडाळा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप सखाराम यांनी केला आहे.संबंधित महिला कमी महिन्यांची गर्भवती होती. मात्र, आमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासले असता बालकाचे ठोके दाखवत नव्हते. त्यामुळे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. –भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.