अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा २७४ वर, विमानातील लोकांशिवाय जमिनीवरील ३३ जण दगावले.

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. यातच घटनेनंतरचे चित्र मन हेलावणारे आहे. या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २७४ वर पोहोचली आहे.अहमदाबादमधील एअर इंडियाची विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. यातच घटनेनंतरचे चित्र मन हेलावणारे आहे. यातच बचाव पथकांना एअर इंडिया AI171 विमानातून बाहेर पडलेला ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. तर आणखी २९ मृतदेह देखील हाती लागले आहेत. त्यामुळे या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २७४ वर पोहोचली आहे. भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातील हा सर्वात भयानक अपघात आहे.या अपघातात विमानातील २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स असे एकूण २४१ जण मृत्यूमुखी पडले. तर केवळ एक जण बचावला आहे. तर ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले त्यांच्यावर देखील विमान अपघाताचा आघात झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढून आता २७४ व पोहोचला आहे.

इतर ३३ बळी हे बी जे मेडिकल कॉलेजच्या परिसरातील लोकांचे गेले असावेत असे सांगण्यात येते. डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय विद्यार्थी, कामगार आणि मेघानीनगर परिसरातील असे काही जण या अपघाताला बळी पडल्याचे समजते.सह पोलीस आयुक्त नीरज बडगुजर यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या मेसच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. गुरुवारी रात्री विमानाचे आपत्कालीन स्थान ट्रान्समीटरही सापडले, असेही ते म्हणाले. तर एअरक्राफ्ट अपघात तपास संस्थेनेही बॉक्स मिळाल्याची माहिती दिली आहे.या अपघाताचा सर्वाधिक फटका हॉस्टेलची इमारत आणि जवळपासच्या परिसरात बसला आहे, जिथे शोध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.

घटनेबाबात राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीकरिता ३१९ मृतदेहांचे अवयव पाठवले आहेत. ज्यात पूर्ण आणि आंशिक अवशेषांचा समावेश आहे.AI 171 विमान अपघाताच्या तपासादरम्यान २४ तासांहून अधिक काळानंतर अधिकाऱ्यांना ब्लॅक बॉक्स सापडला आहे. मेघनीनगर परिसरातील बी जे मेडिकल कॉलेजच्या यूजी आणि पीजी मेस इमारतीच्या छतावर शुक्रवारी डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्जर असलेला ब्लॅक बॉक्स सापडला. तर विमान कोसळला त्या दिवशी रात्री विमानाचा आपात्कालीन लोकेटक ट्रान्समीटरही सापडला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..