कोल्हापूरवरून पुण्यात उतरल्या, रिक्षा पकडताना नाल्यात वाहिल्या…दोन दिवसांनी वारजेला सापडली बॉडी, महिलेसोबत काय घडलं?

पुण्यात नवले पूल परिसरात रस्ता ओलांडताना एक महिला नाल्यात पडून वाहून गेली. अग्निशमन दलाने दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी तिचा मृतदेह वारजेजवळ नदीत सापडला. वडगाव बुद्रुक येथील नवले पूल परिसरात एक महिला रस्ता ओलांडताना नाल्यात पडली आणि वाहून गेली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा प्रकार घडला.

ही घटना गुरुवारी रात्री ११ ते १२ दरम्यान घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. दिवसभराच्या शोधकार्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास महिलेचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात आढळून आला. शोभा मनोहर महिमाने (वय ५७, रा. दर्शन पार्क, फुरसुंगी, मूळ रा. बार्शी) असे मृत महिलेचे नाव आहे.शोभा या कोल्हापूरवरून पुण्यात आल्या. त्या वेळी नवले पुलाजवळ उतरून फुरसुंगी जाण्यासाठी रिक्षा पकडण्याचा प्रयत्न करीत होत्या. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्या. तेथे उपस्थित कारचालकासह तिघांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्या क्षणातच वाहून गेल्या.अग्निशमन दलाच्या कात्रज, सनसिटी, नवले पूल या तिन्ही विभागाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान वडगाव पुलाजवळ या महिलेची पादत्राणे आणि साडी आढळली. अखेर सायंकाळी मुठा नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..