नाल्याच्या पुरात बैलगाडी उलटली आणि अनर्थ घडला, आई आणि आजी-आजोबांसमोर चिमुकला वाहून गेला.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुरुवारी एका दुर्दैवी घटनेत पाच वर्षांचा मुलगा वाहून गेला. मुसळधार पावसामुळे आप्पारावपेठ परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.नांदेड : मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर मागील जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. नांदेडमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात अतिशय दुर्दैवी घटना घडली. नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा चिमुकला आपल्या आई आणि आजी – आजोबांसमोर वाहून गेला. या घटनेत चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतचे इतर चार जण थोडक्यात बचावले.नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ परिसरात गुरुवारी ही दुर्देवी घटना घडली.

या घटनेने किनवट तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अभिनव गजेंद्र गुमुल (वय ५) असं नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.किनवट तालुक्यासह शिवणी, इस्लापूर परिसरात मागील दोन, तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यातच १२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अप्पारावपेठ गावालगतच्या नाल्याला पूर आला. यावेळी शेताकडून बैलगाडी घेऊन शेतकरी गजव्वा गुमुल, लक्ष्मीबाई गुमुल, रुखमाबाई हळदे, लक्ष्मीबाई देशमुख हे ५ वर्षाचा चिमुकला अभिनव गजेंद्र गुमुल यासोबत घराकडे येत होते.नाला पार करताना बैलगाडी पुरात उलटली.

बैलगाडी उलटल्याने गाडीतील पाचही जण पाण्यात पडले. यात चिमुकला अभिनव पाण्यात वाहून गेला. तर इतर ४ जण कसेबसे पाण्याबाहेर आल्याने थोडक्यात बचावले. सदरील घटना अप्पारावपेठ गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेत बालकाचा नाल्यात शोध सुरू केला. तब्बल दोन तासानंतर त्या बालकाचा मृतदेह सापडला.घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी उमेश भोसले यांना कळवताच उपनिरीक्षक अतुल डाकेसह बीट अंमलदार पठाण आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती किनवट तहसीलदार शारदा चौंढेकर यांना कळवण्यात आली. महसूल आणि पोलिस प्रशासनाची कारवाई चालू होती. या दुर्देर्वी घटनेमुळे अप्पारावपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..