राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! मनसे-ठाकरेसेना युतीच्या चर्चेदरम्यान फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट?

मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे दाखल झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफाही तिथे पोहोचला.राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला. या दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अचानक ठरलेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेते महेश मांजकरे यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी युतीसाठी समोरून टाळी दिली होती. महाराष्ट्राच्या प्रश्नांसमोर आमची भांडणं काहीच नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकपणे घेत युतीसाठा हिरवा कंदिल दिला होता. मात्र दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नाही. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट त्या दोघांच्याही नियोजनात नसताना झालेली आहे.

बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये आता ठाकरे बंधूंच्या युतीचा एंस होतो की येत्या निवडणुकांमध्ये आणखी वेगळी काही राजकीय समीकरण जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून महायुतीसाठी काही चांगलं होणार असेल तर या भेटीचे आम्ही स्वागत करतो. ठाकरे मनसेला घेत युतीसोबत आले तर आम्हाला आनंद आहे. दुसरा मुद्दा कोण एकत्र येण्याचा तर राज ठाकरेंचा स्वतंत्र विचार असून ते स्वाभिमानी आहेत. त्यांना समोरच्याने काय अट घातली की शिंदे, फडणवीसांना भेटता कामा नये, अशा अटी टाकून युती होईल आणि राज ठाकरे या अटींसमोर झुकतील हे शक्य नाही हे माझं वैयक्तिक मत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..