टेरेसवर झोपायला गेला अन् तोच काळ ठरला, अचानक खाली कोसळला, उपचारादरम्यान अंत; दोघांचं पितृछत्र हरपलं.

 कोकणातील गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. घराच्या टेरेसवर झोपायला गेलेला तरुण खाली पडून बेशुद्ध झाला होता. त्याच जखमी तरुणाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.कोकणातील गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. घराच्या टेरेसवर झोपायला गेलेला तरुण खाली पडून बेशुद्ध झाला होता. त्याच जखमी तरुणाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुहागर तालुक्यात असगोली येथे ही घटना घडली. असगोली येथे राहणारा गौरव अरूण पवार, वय ३९ वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे.गौरव अरूण पवार हा गावातील एक हुरहुन्नरी व्यक्तिमत्व होता. बोटीवर कामाला होता. मिनी टेम्पो ट्रॅव्हल चालक म्हणूनही तो काम करत असे. तसेच उत्तम क्रिकेटपटूही होता त्याला क्रीडा क्षेत्राचीही मोठी आवड होती. तसंच तो उत्तमरीत्या बॅन्जो ढोल ताशा देखील वाजवायचा. गौरवच्या जाण्याने मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र लहान वयातच हरपलं आहे.

गौरव यांना दोन लहान मुलं असून एक मुलगा दहावीत एक मुलगा आठवी शिक्षण घेत आहे. असा हुरहुन्नरी तरुण गेल्याने संपूर्ण गाव दु:खात बुडाले आहे. गौरवच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण दोन लहान मुले असा परिवार आहे.गुहागर पोलिसांच्या माहितीनुसार, १८ मे २०२५ ला रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. राहत्या घराच्या टेरेसवरून खाली पडुन डोक्याला गंभीररित्या दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला. ही घडली त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा ही होता. त्याच्याकडे लक्ष येताच त्याने प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या मदतीने धावपळ केली व गौरव याला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने जवळच्या गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला अधिक उपचाराकरिता अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे दाखल करण्यात आले. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच दुर्दैवीरित्या त्याचा मृत्यू झाला आहे.३० मे ला चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. चिपळूण पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार गुहागर पोलीस ठाण्यात ९ जून रोजी आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..