नितेश राणेंनी ‘बाप’ काढला, कॅबिनेट बैठकीतच शिवसेनेचे मंत्री खवळले, शिंदे-फडणवीसांनी अखेर…

देवेंद्र फडणवीस यांना नंतर पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे.भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटल्याचे समजते. ‘भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे,’ अशा आशयाचे वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेताना ‘आमचे बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत,’ असे ठणकावल्याचे समजते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याचे समजते.राणे यांनी नुकतेच धाराशिव येथील भाषणात शिवसेनेला लक्ष्य करताना हे वक्तव्य केले होते. राणेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्याचा उल्लेख करत नाराजी जाहीर केल्याचे समजते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याशी चर्चा करत बाप काढणे चुकीचे असल्याचे सांगितल्याचे समजते.दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना नंतर पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. मीदेखील संबंधितांशी चर्चा केली आहे. तुमच्या मनात काहीही असले तरी असे बोलणे योग्य नाही हे त्यांना सांगितलं आहे,’ असेही ते म्हणाले.याआधी, नितेश राणेंचे मोठे बंधू आणि शिवसेना नेते नीलेश राणे यांनीही मंत्रिपदी असलेल्या धाकट्या भावाला समज दिली होती. “नितेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेनच, पण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्याने नेमका कोणाचा फायदा होतोय, याचं भान ठेवलं पाहिजे. आपण महायुतीत असल्याचं विसरुन चालणार नाही.” अशी पोस्ट नीलेश राणेंनी एक्स वर केली होती.दरम्यान, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठीची कार्यवाही करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत एक विधेयक आणण्यात येणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..