भिंतीवर डाग, पुण्यातील IT अभियंता अभिलाषाच्या मैत्रिणीने सांगितलं, पोलिसांनी काय काय जप्त केलं?

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे, वय 25 वर्षे, रा. हिंजवडी, असे या मयत तरुणीचे नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती.‘माझी जगायची इच्छा संपली आहे’, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी 4 जून रोजी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे, वय 25 वर्षे, रा. हिंजवडी, असे या मयत तरुणीचे नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती.

तिची एक मैत्रीण द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रिणीकडे दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली.याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषाची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले.अभिलाषा तिच्या मैत्रिणीसोबत हिंजवडीतील सोसायटीत राहत होती. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजतापर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही.बाथरुमच्या भिंतीवर त्यावेळी रक्ताचे पुसट डाग दिसले, त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, ती रुममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करीत होते. तिचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रुमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी घरात पाहणी केली असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाइड नोट मिळून आली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वत:च्या मर्जीने करीत आहे,’ असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहे. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.