सेल्फी काढताना मुलगा पडला धरणात; वडिलांना हृदयविकारचा धक्का, सिंधुदुर्गमधील काळजी पिळवटून टाकणारी घटना.

कोकणात धरणात बुडून मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांचाही पाठोपाठ मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे घडली आहे. कारिबडे-पेडवेवाडी धरणावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या क्रिश सावियो संभया (वय १९, रा.सालईवाडा) हा युवक तोल जाऊन धरणाच्या जलाशयात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. दरम्यान, मुलाच्या या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे वडील सावियो आग्नेल संभया (४८) यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तत्काळ रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.मुलापाठोपाठ वडिलांचेही निधन झाल्याने संभया कुटुंबीय कोलमडून गेले आहे.

क्रिश हा मंगळवारी सायंकाळी मित्रांसोबत कारिवडे धरणावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व धरणाच्या जलाशात बुडाला. मित्रांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यातही कल्पना देण्यात आली. अखेर सायंकाळी ७ वाजता बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत धरणाच्या जलाशयात शोधमोहीम राबवली.अखेर रात्री ११ वाजताच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगत आला. तो मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा धरणात बुडाल्याचे वृत्त ऐकून क्रिशचे वडील सावियो यांना जबर मानसिक धक्का बसला. मंगळवार रात्रभर ते धक्क्यातच होते.

त्यातच बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकारचा धक्का बसल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी ६ वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.’सामाजिक बांधिलकी’ प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी तातडीने आरोग्य यंत्रणा हलवली. ऑन-कॉल ड्युटी बजावत असलेले डॉ. अभिजित चितारी काही मिनिटांतच रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी सावियो संभया यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु, उपचारादरम्यानच बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांचे रुग्णालयात निधन झाले. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचेही निधन झाल्याच्या या हृदयद्रावक घटनेमुळे संभया परिवार, मित्रमंडळांवर शोककळा पसरली आहे. एका क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. क्रिश संभया हा या वर्षीच सावंतवाडीतील मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेजमधून बारावी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पुढील उच्च शिक्षणासाठी तो लवकरच प्रवेश घेणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.