प्लास्टिक पिशवीत लघवी करून त्याच हातांनी फळविक्री.. डोंबिवलीतील किळसवाण्या प्रकार.

प्लास्टिक पिशवीत लघवी करून त्याच हातांनी फळविक्री.. डोंबिवलीतील किळसवाण्या प्रकार.

नेकांना रस्त्यावरील गाड्यांवरून भाज्या, फळं विकत घेण्याची सवय असते. बाजारातही अनेक फळविक्रेते असतात. पण ते सर्वच जण स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळतात, हायजीनकडे लक्ष देतात की नाही हे मात्र लोक बघत नाहीत. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये एका ज्यूस सेंटरमधून ज्यूसमधून मानवी मूत्र मिसळून दुकानदार ग्राहकांना देत असल्याचे उघड झाले होते. उत्तर प्रदेशातील या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले, लोकंही संतापले. मात्र हे प्रकरण अद्याप ताजं असतानाच महाराष्ट्रातील मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीतूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

डोबिवलीतील निळेज गावात ही किळसवाणी घटना घडली आहे. निळजे गावातील एक फळविक्रेता प्लास्टिक पिशवीत लघुशंका करून त्याच हातांनी फळं विकत असल्याचा एक किळसावाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे. या व्हिडिओमध्ये हा फळविक्रेता एका प्लॅस्टिकच्या पिशवित लघुशंका करून ती पिशवी तेथेच ठेवून देतो व त्याच हाताने तो फळविक्री करत असल्याचे दिसत आहे.ही घटना उघड झाल्यावर संतप्त नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ककठोर भूमिका घेत त्या फळविक्रेत्याला जाब विचारत मारहाण केली आणि अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

वारंवरा तक्रार करूनही, पोलीस कारवाई करूनही फेरीवाले हटत नसल्याने अखेर नागरिक संतापले. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत परिसरातील फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड केली तसेच हे किळसवाणे कृत्य करणाऱ्या फळवाल्याला चोपही दिला. मानपाडा पोलिसांनी त्या फळविक्रेत्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या डोंबिवलीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.