नांदेड मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी

नांदेड मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी

तीर्थ यात्रेला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. भरधाव ववेगाने जात असलेल्या कंटेनरची धडक बसल्याने ट्रॅव्हल्समधील २० भाविक जखमी झाले. यातील पाचजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नरसी-नायगांव महामार्गावर हा अपघात घडला. भाजप आमदार राजेश पवार यांनी मतदार संघातील मतदारांसाठी तीर्थ यात्रेची योजना आखली होती. मतदार संघातील एक हजार भाविकांसाठी २२ ट्रॅव्हल्स आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ४० महिला आणि पुरुष (एम. एच. १२ एफ सी ९०१७) हे एका ट्रॅव्हल्समधून बीड जिल्हातील कपिलाधार येथील मन्मथ स्वामीच्या दर्शनाला निघाले. नरसी-नायगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर येत असताना भरधाव वेगाने कंटेनरने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या धडकेनेनंतर ट्रॅव्हल्समध्ये खिडकीला बसलेली एक चिमुकली बाहेर पडली.

या अपघातात तुकाराम संतराम इबितवार (वय २५), पांडुरंग नागोराव इबितवार (वय २८), सानवी विश्वनाथ लालवंडे (वय ७), विश्वनाथ अशोक लालवंडे (वय २८), महानंदाबाई शिवराज भुरे (वय ४०), लक्ष्मीबाई भुरे (वय ५०), दत्ता लालवंडे (वय ६२), राजेंद्र संभाजी होनराव (वय ५६), रमेश निळकंठ टोंपे, हावगीरराव पिडकोरे (वय ६२), स्वाती विश्वनाथ लालवंडे (वय २७), अंजनाबाई पिंडकोरे, हनमंत लालवंडे (वय ३५), पार्वतीबाई शिवशाम भुरे (वय ४५), बसवदे गोविंद (वय ६०), दिव्या लालवंडे (वय १२), इंदरबाई संभाजी लालवंडे (वय ८०), सुमन डाकोरे (वय ६०), शंकर काशीनाथ भुरे (वय ६०) अदिसह अन्य एक असे २० प्रवासी जखमी झाले. अनेकांना हातापायाला मार लागला. आठ जणांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.