कॉफीवरुन वाद अन् हनिमूनला गेलेल्या राजाचा खून; शस्त्र सापडलं, बायको अजूनही बेपत्ता, गूढ वाढलं.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील एक जोडपं लग्नानंतर शिलाँग येथे हनिमूनला गेले होते. मात्र, तिथे त्यांच्यासोबत अघटित घडलं आहे. हे जोडपं बेपत्ता झालं होतं. त्यापैकी पतीचा मृतदेह सापडला आहे तर पत्नी अद्याप बेपत्ता आहे.शिलाँग येथील बेपत्ता झालेल्या हनिमून कपलसोबत नेमकं काय घडलं, याचं गुपित आता हळूहळू समोर येत आहे. याप्रकरणी मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशीच्या हत्येसाठी वापरलेलं धारदार शस्त्र आणि त्याचा मोबाईल फोन जप्त केला आहे. तर त्यांच्या बेपत्ता पत्नीचा शोध सुरू आहे, अशी माहिती आहे.

कॉफीच्या गुणवत्तेवरून झालेल्या वादामुळे हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबाला या जोडप्यामध्ये आणि स्थानिक कॉफी कॅफे विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याचा संशय आहे. या खळबळजनक हत्येमागील हेतू जाणून घेण्यासाठी पोलीस सर्व धागोदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलीस प्रमुख विवेक सायम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला एक धारदार शस्त्र सापडले आहे. हे एक नवीन धारदार शस्त्र आहे आणि ते हत्येच्या उद्देशाने वापरले गेले असण्याची शक्यता आहे. हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं आहे”, असंही ते म्हणाले. त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, यात काही शंका नाही. आम्ही खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.राजाच्या हत्येमागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. ही हत्या दरोड्यातून झाली, कोणी सूड उगवला की, आरोपी आणि पीडितांमधील वैयक्तिक वाद आहे, याचा तपास केला जात आहे, असे सायम म्हणाले.राजाचा मृत्यू दरीत फेकण्यापूर्वी झाली की नंतर झाला हे निश्चित करण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर, आम्हाला मृत्यू कशामुळे आणि कसा झाला याची संपूर्ण माहिती मिळेल, त्यानुसार पुढील तपास केला जाईल, असेही ते म्हणाले.दरम्यान, राजाची पत्नी सोनमसाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. राजाचा मृतदेह जिथे सापडला त्यापासून 1-2 किलोमीटरच्या क्षेत्रात शोध मोहीम वाढवण्याची पोलिसांची योजना आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.