जालना जिल्ह्यातील वरुडमध्ये देवदर्शनाला गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश जोशी, रोहन जोशी आणि दिपाली जोशी अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे एकाच कुटुंबातील होते. महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे त्यांनी घरी सांगितले. मुले परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.जालना: जालना जिल्ह्यातील वरुड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुले सोमवार सकाळपासून बेपत्ता होती. त्यांचा शोध सुरू असताना, गावातील एका शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळले. यश जोशी (वय १४), रोहन जोशी (वय ७) आणि दिपाली जोशी (वय ९) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही एकाच कुटुंबातील होते.काल सकाळी ही मुले महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. “आम्ही महादेव मंदिरात दर्शनासाठी चाललो आहोत,” असे त्यांनी घरच्यांना सांगितले. मात्र, रात्र झाली तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. परंतु, शेततळ्यात त्यांचे मृतदेह सापडले.











