अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे मागील आठ दिवसांपासून नाशिकमधील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणातील गंभीर आरोप आणि करुणा शर्मा यांनी केलेले आरोप या विविध कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या मन:शांतीच्या शोधात आहेत. सध्या ते इगतपुरी (Igatpuri) येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर मुंडे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीत दाखल झाल्याचे समोर आले आहे. आता याबाबत मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झाले आहेत. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. आता मन:शांतीसाठी होईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.










