मुली…पोलिसात तक्रार करु नकोस! माहेरच्यांना अब्रुची चिंता, सासरच्यांना पैशांची हाव, उपाशी ठेवलं, मनाविरुद्ध गर्भपात केला, अखेर…

राज्यात हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहीतेला सासरच्या लोकांनी पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणायला सांगितले. हुंडा आणि करणीच्या नावाखाली विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केला. तिच्या मनाविरुद्ध तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर उदगीर पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उदगीरमध्ये घडलेल्या या घटनेने हुंडाबळीच्या घटना पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या आहेत. महिलेला सासरच्या लोकांनी माहेरहून ३० लाख रुपये आणण्यास सांगितले.

“तीस लाख रुपये घेऊन ये, त्याशिवाय मूल होऊ देणार नाही,” असं ते पीडितेला म्हणाले. तिला उपाशी ठेवलं आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील करण्यात आला. ती चार महिन्यांची गर्भवती असताना, तिच्या नवऱ्याने, सासू-सासऱ्यांनी आणि नणंदेने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे तिचा गर्भपात झाला. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना समोर येत आहेत.या प्रकरणी फिर्यादी महिलेने तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी तिला पोलिसात तक्रार नको करु, असं सांगितलं. पण महिलेने स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी महिलेला नवीन पेट्रोल पंप सुरु करायचा आहे, यासाठी माहेरहून पैसे आणायला दबाव टाकला. पैसे न आणल्यामुळे तिला त्रास दिला गेला. तिला उपाशी ठेवले, मारहाण केली आणि तिचा मानसिक छळ केला गेला.या घटनेमुळे समाजात हुंडा मागणीच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हुंडा मागणी आणि हुंडाबळीच्या विरोधात कठोर कायदे असूनही अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. समाजात महिलांच्या संरक्षणासाठी आणि हुंडा मागणीसारख्या सामाजिक समस्यांवर आळा घालण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.