ठाकरे गटापाठोपाठ उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार, अजित पवार गटात जोरदार इन्कमिंग.

 गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट, शेकापला रायगडात मोठा हादरा बसला आहे. त्यापाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात शरद पवार यांच्या पक्षालाही खिंडार पडले आहे.गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट, शेकापला रायगडात मोठा हादरा बसला आहे. त्यापाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात शरद पवार यांच्या पक्षालाही खिंडार पडले आहे. उरणमधील शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत घड्याळ हाती घेतले आहे.उरणच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री सुनील तटकरे यांची भेट घेतली.

तर अजितदादा पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले मनोजद भगत, माजी कार्याध्यक्ष रमण कासकर, प्रवक्ते अजित पाटील , भेंडखळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य लिलेश्वर भगत, तत्कालीन तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर, उरण विधानसभा सरचिटणीस निलेश पाटील, तत्कालीन उरण तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मच्छिंद्र आदी पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रदेश कार्यालयात सुनील तटकरे यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष परिक्षित प्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस गर्जे, आनंद परांजपे, उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आदी उपस्थित होते.प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे समाधान व्यक्त केले. नव्याने पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात इन्कमिंग वाढली आहे. तर ठाकरे गटासोबतच शेकाप आणि शरद पवार गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे पक्षवाढीचे आव्हान या पक्षांसमोर असणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.