लग्नासाठी मामाच्या गावी आला, मित्रांसोबत खेळायला गेला अन् अनर्थ घडला, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू.

मामाच्या गावी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना तो साचलेल्या पाण्यात पडला आणि दोघांचा या घटनेत मृत्यू झाला.विवाह सोहळ्यासाठी मामाच्या गावी आलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर आणि त्याच्या मित्रावर काळाने घाला घातला. खदानीत साचलेल्या पाण्यात बुडून या दोघांचाही मृत्यू झाला आहे. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहती आहे. संघर्ष बाळू पडघणे (वय 16) आणि निखिल कुंडलिक वाढवे (वय 15) अशी मृतकांची नावं आहेत.

या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.संघर्ष पडघणे हा हदगाव तालुक्यातील नवरी गावातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तो एका विवाह सोहळ्यासाठी मामाच्या गावी गारगव्हाण येथे गेला होता. गुरुवारी (29 मे) सकाळी संघर्ष हा गावातील निखिल वाढवे अणि इतर दोन मुलांसह खदानीकडे खेळण्यासाठी गेला होता. खेळता- खेळता एका मुलाचा पाय घसरून तो खदानीत साचलेल्या पाण्यात पडला. हे पाहताच मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, खदानीत पाणी जास्त असल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोघांनी गावात जाऊन नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. गावाकरऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.मागील काही दिवसा पासून हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. ढगसदृश्य पाऊस झाल्याने खदानीत मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले होते. या खदानीत अनधिकृतरित्या खोदकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रेल्वेच्या कामासाठी विदर्भातील एका खाजगी कंट्रक्शन गारगव्हाण येथील गट नंबर 87 मध्ये हजारो ट्रीप मुरूम नेऊन उत्खनन केले, त्यामुळे दोन शाळकरी मुलांना आपले जीव गमवावा लागला आहे. संबंधित कंपनीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मृत झालेल्या बालकाच्या कुटुंबीयांची मागणी आहे. दरम्यान, या घटनेने गारगव्हाण गावात एकच शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.