पाकिस्तानमधील महिलेची रिक्वेस्ट आली असेल तर ही बातमी एकदा वाचाच, ठाण्यातील दोघांना अटक.

पाकिस्तानमधील महिलेची रिक्वेस्ट आली असेल तर ही बातमी एकदा वाचाच, ठाण्यातील दोघांना अटक.हेरगिरी करणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे येथील एका तरुणाला अटक केली आहे. रवींद्र वर्मा (२५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, फेसबुकवरील पाकिस्तानी गुप्तहेराने त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. मुंबईसह राज्यातील प्रतिबंधित आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती आणि छायाचित्रे त्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी हेराला पुरविल्याचे समोर आले आहे.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताच्या वतीने करण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर‘ यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंर्धामधील तणाव अधिक वाढला आहे.

त्यामुळे सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून हालचाली संशयास्पद असलेल्यांवर नजर ठेवली जात आहे. संरक्षण विभागाशी संबंधित एका कंपनीत काम करणारा ठाणे येथील रवींद्र वर्मा हा तरुण पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या सदस्याच्या संपर्कात असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या गोपनीय माहितीवरून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी खोलवर तपास केला असता, रवींद्र वर्मा आणि त्याच्या दोन मित्रांची नावे समोर आली. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वर्मा याच्यासह त्याच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. रवींद्र वर्मा हा नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकवरून एका पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. महिलेच्या नावाने अकाउंट सुरू करून रवींद्र याला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. तेव्हापासून रवींद्र हा पाकिस्तानी हेराच्या संपर्कात होता. संरक्षण दलासंदर्भातील कंपनीत काम करीत असल्याने प्रतिबंधित आणि संवेदनशील ठिकाणी त्याला प्रवेश मिळत होता.पाकिस्तानी हेराने मधाळ बोलण्याने रवींद्र याला आपलेसे करीत महत्त्वाच्या ठिकाणांची गोपनीय माहिती आणि छायाचित्रे पाठविण्यास भाग पाडले. रवींद्रने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पुरविल्याचे समोर आले. त्यामुळे जर तुम्हालाही अशा प्रकारे कोणत्या महिलेची रिक्वेस्ट आली असेल किंवा तुम्ही पाठवणार असाल तर वेळीच सावध व्हा.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.