बावनकुळेंना ‘तो’ रोखठोक सवाल अन् रणजीतसिंह मोहिते पाटलांवर मान खाली घालण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

माढा लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात नाराजी होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. राम सातपुते यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.माढा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात नाराजी पसरली होती. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्षांकडून पक्ष विरोधी कारवाई प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. पक्षविरोधी काम केल्या प्रकरणी ती नोटीस देण्यात आली होती, त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. कारवाई प्रकरणी प्रश्न विचारताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी मान खाली घालून बसणे पसंद केले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना उत्तर देताना केंद्रीय अनुशासन समितीकडे बोट केले.रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याची तक्रार त्यांच्या विरुद्ध भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती. राम सातपुते यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिलं होतं.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन माध्यमांशी सवांद साधला.

जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठका घेऊन पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची देखील उपस्थिती होती. घडलेल्या प्रकारानंतर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. हेच नाही तर त्यांना त्याबद्दल नोटीस देखील पाठवण्यात आली. भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी ही तक्रार केली होती आणि त्यानंतर नोटीसही पाठवण्यात आली. मात्र, त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही करण्यात आली नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.