शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आवाहन ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य.

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आवाहन ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ या योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.सन 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांची निवड करताना किमान बारावी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा 25 ते 60 वर्षे अशी अट होती. मात्र, मा. आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत शिक्षण आणि वयोमर्यादा यासंबंधी अटी रद्द करण्यात आल्या आहेत.

योजनेअंतर्गत महिलांचे शेतीतील योगदान लक्षात घेता, सन 2025-26 या वर्षासाठी महिला शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे.2024-25 मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड या देशांची निवड अभ्यासदौऱ्यासाठी करण्यात आली होती. तर 2025-26 या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन निकष व दौऱ्याचे देश बदलण्यात आले असल्यामुळे 2024-25 मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची यापूर्वी निवड झाली होती, त्यांनी नव्याने अर्ज केल्यास आणि पात्र ठरल्यास त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाणार आहे, असे तंत्र अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.