जॉईनिंगची तारीख बदलली अन् होत्याचं नव्हतं, विक्रोळीत गुलमोहराचं झाड पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू.

 नव्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने सोमवारी तेजस रात्रपाळीला जाणार होता. मात्र, त्या कंपनीच्या ‘एचआर’ विभागातून दूरध्वनी आला आणि तो पहिला दिवस बुधवार, 28 मे रोजीचा ठरलागुलमोहरचे मोठे झाड अचानक उन्मळून अंगावर कोसळल्याने विक्रोळी कन्नमवार नगर येथील पॅराडाईस टॉवर या संक्रमण शिबिरातील इमारतीत राहणाऱ्या तेजस नायडू या 26 वर्षीय तरुणाचा सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्यासोबतचे दोन मित्र या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनीच त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करून घेण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेने कन्नमवार नगर जनता मार्केट परिसरात शोककळा पसरली आहे.

नव्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने सोमवारी तेजस रात्रपाळीला जाणार होता. मात्र, त्या कंपनीच्या ‘एचआर’ विभागातून दूरध्वनी आला आणि तो पहिला दिवस बुधवार, 28 मे रोजीचा ठरला. त्यामुळे रात्री 8 वाजताच्या सुमारास मित्रांसोबत निवांत गप्पा मारण्यासाठी गणेश मैदानात गेलेल्या तेजसवर अचानक काळाचा घाला आला आणि त्याचा अंत झाला. ठरल्याप्रमाणे पहिल्या रात्रपाळीच्या ड्युटीवर जावे लागले असते तर कदाचित तेजसचा प्राण वाचला असता…‘तेजसने काही दिवसांपूर्वी आधीची नोकरी सोडली होती आणि नव्या कंपनीत त्याची निवड झाली होती. त्याप्रमाणे 26 मे हाच त्याचा नव्या कंपनीतील नोकरीचा पहिला दिवस होता. रात्रपाळी होती. पण त्याच दिवशी त्याला कंपनीच्या एचआर विभागातून दूरध्वनी आला आणि पहिला दिवस 28 मे रोजीचा ठरला असल्याचे त्याला सांगण्यात आले. म्हणून तो मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी जनता मार्केट येथील गणेश मैदानात गेला होता. पण अचानक हे घडले आणि आम्ही तेजसला गमावले’, असे तेजसची बहीण नम्रता नायडू हिने ‘मटा’ला सांगितले.दरम्यान, ‘कन्नमवार नगर परिसरात अनेक मोठमोठी झाडे आहेत. अनेक वृक्ष हे रस्त्यांलगत व इमारतींच्या संरक्षक भिंतींलगत आहेत. या सर्व झाडांची योग्य ती पाहणी करून वरच्या फांद्या छाटणे आवश्यक आहे. याविषयी महापालिकेला पत्रही लिहिले आहे. पूर्वीही स्थानिकांनी पत्र लिहिले होते. तेजसच्या मृत्यूच्या घटनेनंतरही पत्र लिहिले आहे. महापालिका याची वेळीच दखल घेईल, अशी अपेक्षा आहे’, असे पॅराडाईस टॉवर सोसायटीतील रहिवासी राजेश सावंत यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.