पुण्यात शिंदेंचे युवासेना पदाधिकारी नीलेश घारेंना अटक, स्वतःच्याच कारवर गोळीबार घडवला, कारण धक्कादायक.

पोलिस चौकशीत सचिन गोळे, शुभम खेमणार व अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक झाली. चौकशीतून ही संपूर्ण घटना बनावट असल्याचे स्पष्ट झाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश घारे यांना अटक करण्यात आली आहे. पिस्तुलाचा परवाना आणि पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच कारवर गोळीबार घडवून आणल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी उशिरा घारे यांना अटक केली. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, चौथा आरोपी संकेत मोताळे सध्या फरारी आहे. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अटकेमुळे पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.ही घटना 19 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली होती.

घारे वारजे माळवाडीतील रामनगर येथील पक्ष कार्यालयात गेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घारे धावत बाहेर आले. तोपर्यंत दोघे पसार झाले होते, असे घारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद होते.पोलिस चौकशीत सचिन गोळे, शुभम खेमणार व अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक झाली. चौकशीतून ही संपूर्ण घटना बनावट असल्याचे स्पष्ट झाले. घारे यांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता; परंतु तो रद्द झाल्याने त्यांनी ही बनावट घटना घडवून आणली. सध्या पोलिस फरारी आरोपी संकेत मोताळेचा शोध घेत आहेत.‘तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील पूर्वीच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याचे आरोपींकडून सांगण्यात येत होते. मात्र, तक्रारदार आणि आरोपी एकमेकांचे निकटवर्तीय असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरुन तपास केला जात आहे,’ अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली होती.‘नीलेश घारे यांनी पिस्तूल परवाना मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना परवाना नाकारण्यात आला होता. त्यांनी पोलिसांची सुरक्षा मिळावी, यासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला होता,’ अशी माहितीही संभाजी कदम यांनी दिली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.