वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कर्नाटक कनेक्शन, माजी मंत्र्यांच्या मुलाला अटक, खळबळजनक माहिती समोर.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.वैष्णवी हगवणे संशयित आत्महत्या प्रकरणात फरारी आरोपींना मदत केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम अडचणीत आला आहे. पोलिसांनी प्रीतमसह पाच जणांना अटक केली असून, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे.प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनादेखील अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपींनी फरारी असलेल्या राजेंद्र व सुशील हगवणे यांना लपवले, त्यांना राहण्याची सोय करून दिली, आर्थिक मदत पुरवली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणेसाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचेही उघड झाले आहे.

आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या, कोणकोण सहभागी होते, याचा तपास पोलिस करीत आहेत.वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र तुकाराम हगवणे याने गुन्हा घडल्यानंतर पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहात पोलिस तपासापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, त्याने अनेक लॉज, फार्महाऊस, मित्रांची घरे, तसेच हटिल्समध्ये मुक्काम करत स्थानिक मदतीच्या आधारे ठिकाणे बदलली. पोलिस तपासात हा संपूर्ण प्रवास उघड झाला असून, त्याला मदत करणाऱ्यांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.सून वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आपल्या मुलाला घेऊन औंध येथील रुग्णालयात गेला. तेथून त्याचा प्रवास मुळशीमधील ‘मुहूर्त लॉन्स’ मार्गे वडगाव मावळकडे झाला. यानंतर त्याने पवना डॅम परिसरातील एका खासगी फार्महाऊसवर आश्रय घेतला. त्याठिकाणी त्याचा मुक्काम होता. यानंतर त्याने आळंदी येथील लॉजवर मुक्काम केला होता. ही सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात असून, गर्दीपासून दूर असल्यामुळे त्याला पोलिस तपासापासून लपून राहण्यास मदत झाली. दरम्यान, १८ मे रोजी पुन्हा तो कार बदलून वडगाव मावळ भागात गेला. त्यानंतर एका बेळगाव (कर्नाटकमधील) नोंदणी असलेल्या गाडीतून त्याने प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे.

१९ मे रोजी साताऱ्यातील पुसेगाव येथील अमोल जाधव याच्या शेतावर गेला. त्यानंतर पसरणी मार्गे तो थेट कोगनोळीकडे रवाना झाला. ‘हॉटेल हेरिटेज’मध्ये ते दोन दिवस थांबले होते. या काळात तो सतत गाडी बदलत होता, तसेच मोबाइल बंद ठेवून संवाद टाळत होता. यामुळे पोलिसांना त्याचा मागोवा घेणे अवघड गेले. अखेर २२ मे रोजी तो पुण्यात परतत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, आरोपीच्या हालचालींसोबत त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीही पोलिसांनी टिपल्या आहेत. सर्व लॉज, हॉटेल्स आणि फार्महाऊसची सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून, काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे.या संपूर्ण पलायनात राजेंद्र हगवणे याला कोणत्या कोणत्या व्यक्तींची मदत मिळाली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे. यामध्ये वाहन उपलब्ध करून देणारे, लॉज किंवा हॉटेल्समध्ये बिननोंद मुक्काम करू देणारे, आर्थिक मदत करणारे; तसेच मार्गदर्शन करणारे अशा चार ते पाच जणांची चौकशी सुरू आहे. काहींना समन्स बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.