तू मला फसवलं, तुझ्यामुळे मी.. पत्र लिहून तरुणाने नको ते केलं, पाहताच भावाच्या पायाखालची जमीन सरकली.

सोलापुरात एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. प्रेमप्रकरणातून या तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविलं आहे. उज्ज्वल अरुण साबळे (रा. कोर्ट कॉलनी, कंबर तलाव, सोलापूर विजयपूर रोड, सोलापूर) या तरुणाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उज्ज्वल साबळे या तरुणाने एक पत्र लिहून ठेवलं आहे. या पत्रात उज्ज्वल साबळेने प्रेयसीला उद्देशून म्हटले आहे की, तू मला फसवलं… तुझ्यामुळे मी फसलो. त्यानंतर त्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.

एका प्रियकराने नैराश्यमधून टोकाचे पाऊल उचलल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. उज्ज्वल साबळेने राहत्या घरात सिलिंगच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.उज्ज्वल साबळे या तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधातून उज्ज्वलला नैराश्य आले होते. अनेक दिवसांपासून उज्ज्वल साबळे चिडचिड करत होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा सुरू आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘तू मला फसवलं….तुझ्यामुळे मी फसलो’ असे नमूद केले आहे. उज्ज्वल हा खासगी ठिकाणी कामाला जात होता तर आई कोर्टात बेलिफ म्हणून कार्यरत आहे. कार्यक्रम असल्याने आई नातेवाईकांकडे मुंबईला गेली होती. उज्ज्वल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती आहे. यातूनच त्याने आपल्या आयुष्याची अखेर केली.

याबाबत त्याने एका डायरीत नोंद केली आहे.तणावात असलेला उज्ज्वल अनेक दिवसांपासून एकटा आणि शांत राहत होता. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात कोणी नसताना त्याने आपली जीवनयात्रा संपवली. शनिवारी रात्री भाऊ कामावरून घरी आला, त्यावेळी उज्ज्वल हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. उज्ज्वलला अशा अवस्थेत पाहून भावाला धक्काच बसला. त्याने एकच टाहो फोडला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे जमले, त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने उज्ज्वलला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.