महिलेला दमदाटी करीत तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेकडील सोन्या चांदीचे दागिने व रोकड हिसकावून चोरटा पसार झाला .पाण्याचा दबाव तपासण्याच्या बहाण्याने घरात शिरून एकाने महिलेसह तिच्या बाळास जीवे मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चोरट्याने घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा 4 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला होता. या प्रकरणातील संशयितास गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या पथकाने संसरी गावातून पकडले.सुशील अनिल ठाकूर, वय 21 वर्ष, रा. हरीधाम अपार्टमेंट, संसरीगाव, असे संशयिताचे नाव आहे. देवळाली कॅम्प परिसरात चोरट्याने शुक्रवारी दि. 23 मे रोजी दुपारी दोन वाजता पीडित महिलेच्या घरात पाण्याचा दबाव तपासण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. त्यानंतर पीडितेस तिच्यासह बाळाला जीवे मारण्याची धमकी दिली.










