नाशिकमध्ये ठाकरे गटाला झटका, माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न.

माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची साथ सोडत शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची साथ सोडत शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दराडे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने येवल्यात भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशा आणि कारवाईचे शुक्लकाष्ठ लागू नये, यासाठी दराडेंनी सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.शिवसेना एकसंघ असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना आमदारकीची संधी दिली होती. अलीकडेच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली. त्यांचे बंधू किशोर दराडे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे नरेंद्र दराडे हेदेखील शिंदे गटात जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून होती. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या निवडणुकीत महायुतीचा जोर राहण्याची शक्यता असल्याने तसेच महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार असल्याने दराडे शिंदे गटात जाणार हे सर्वश्रुत होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ‘उबाठा’ गटाला धक्का बसला आहे. याप्रसंगी शिंदे गटाच्या नेत्या मीना कांबळी, आमदार किशोर दराडे, सचिव राम रेपाळे, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.येवला तालुक्यात दराडे हे मंत्री छगन भुजबळ यांचे प्रबळ राजकीय विरोधक असून, दराडे विरुद्ध भुजबळ यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दराडेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यामागे बळ उभे केले होते. त्यामुळे भुजबळ विरुद्ध दराडे असा संघर्ष रंगला होता. या वादातूनच दराडे यांच्यामागे बनावट लेटर हेड प्रकरण लागले होते.

आता दराडे यांनी भुजबळांच्या त्रासापासून संरक्षण मिळवण्यासाठी शिंदे गटाची निवड केली आहे. आगामी काळात भुजबळ आणि दराडे यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.आमदार नरेंद्र दराडे यांच्यासोबत माजी नगरअध्यक्ष रामदास दराडे, माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, नगरसेवक दयानंद जावळे, अनिल जैन, अंबादास कस्तुरे, उत्तम आहेर, सरपंच भानुदास गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे संतोष वैद्य, महिला आघाडी प्रमुख वर्षा देशमुख तसेच उबाठा, मनसे, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, आदींनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे येवला तालुक्यात शिंदे गटाला मोठे बळ मिळाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.