यावल वनविभागाच्या सतर्कतेमुळे सातपुडा वनक्षेत्रातील परप्रांतीयांचा शिकारीचा प्रयत्न उधळला.

यावल वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेंज पथक वैजापूर सह वैजापूर वन क्षेत्रातील परिमंडळ वैजापूर मधील कक्ष क्रमांक २२६,२२५ ,२२३ व २३२ या भागात मिळालेल्या गुप्त बातमी वरून गस्त करीत असतांना कक्ष क्रमांक २३२ मधील जंगल भागात गावठी बंदुकीने फायर झाल्याचा आवाज आला.वन विभागाच्या पथकाने आपल्या सहकर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतांना काही अज्ञात इसम यांच्याकडे गावठी बंदुके दिसून आले.तरी सदरील अज्ञात इसमांचा पाठलाग केला असता पथकाची चाहूल लागताच त्यांनी कक्ष क्रमांक २३२ या भागात लपवलेले दोन मोटर सायकल सोडून जंगल भागात दऱ्या खोऱ्यांचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले.तरी अज्ञात इसम हे राखीव वनात अपप्रवेश करून शिकारीच्या उद्देशाने आलेले असुन जंगल भागात पथकासह फिरून पहिले असता कोणत्याही प्रकारे वन्यजीव हानी झालेली नाही.

यात दोन मोटार सायकल जप्त करून शासकीय वाहनाने चोपडा शासकीय डेपोत जमा करण्यात आल्या असल्याचे वन विभागाकडून कळविण्यात आले आहे.सदरील गुन्हा हा भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (ड),(आय),महाराष्ट्र वन नियमावली ९,वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५२ चा भंग झाला असून त्याबाबत म.वनपाल वैजापूर यांनी प्रथम गुन्हा नंबर डब्लू २/२२/५/२०२५ जारी केला आहे.

सदर कार्यवाहीत संपुर्ण रात्र गुन्हा थांबवण्यासाठी व आरोपींचा पाठलाग करण्यासाठी आय.एस.तडवी वनपाल वैजापूर,संदीप भोई,चूनिलाल कोळी,बाजीराव बारेला,भारसिंग बारेला,संदीप ठाकरे,निखिल माळी,हर्षल पावरा,गणेश बारेला,विजय शिरसाठ यांनी सहभाग नोंदवला.सदरची कार्यवाही ही नीनु सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशिक,जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग प्रादेशिक जळगांव,प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा,समाधान पाटील,सहाय्यक वन संरक्षक यावल व विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अली.तरी वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांचेकडून जनतेस आव्हान करण्यात येते की,आपल्या वनक्षेत्रास लागून कोणत्याही प्रकारे वन वनवा,अवैध वृक्षतोड,अवैध लाकुड वाहतूक,अतिक्रमण,अवैध शिकार व वन्यजीव तस्करी अश्या प्रकारचा गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच याबाबी घडतांना आपल्या परिसरात निदर्शनास आल्यास महाराष्ट्र वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.