महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागल्याने भुजबळ नाराज झाले होते.वनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज मंत्रालयातील विस्तारित इमारतस्थित दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयात पदभार स्वीकारत आहेत. यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं पद आणि कार्यालय हे छगन भुजबळ यांना वर्ग करण्यात आलेलं आहे.मंत्रालयातील विस्तारित इमारतीमध्ये असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयातून ते आपला पदभार स्वीकारून कामाचा श्रीगणेशा करणार आहेत. छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कुठलं खातं वर्ग करण्यात येईल याची फार चर्चा माध्यमांमध्ये पाहायला मिळाली होती.










