लातूरच्या लॉजवर तुळजापुरचे क्रिकेटपटू अन् पुजारी नको त्या अवस्थेत सापडले; पोलिसांच्या धाडीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश.

 लातूर शहरातील आनंद लॉजमध्ये सुरु असलेल्या अश्लील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून लॉजवर सुरु असणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश केला.लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा आता सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूर शहरातील एका लॉजवर अश्लील प्रकार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळताच लातूर पोलिसांनी आनंद लॉजवर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत तुळजापुरचे तरुण नको त्या अवस्थेत सापडले असून त्यातील काही जण क्रिकेटपटू आहेत तर काही पुजारी आहेत. लातूर शहरात काही दिवसांपूर्वी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर आता पुन्हा एकदा लॉजवर छापेमारीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 क्रिकेटपटूंसह 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लातूर शहरातील आनंद लॉजमध्ये सुरु असलेल्या अश्लील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून लॉजवर सुरु असणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश केला. यात पोलिसांनी पश्चिम बंगालच्या दोन तरुणींची सुटका केली असून या कारवाईत 10  जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील 4 संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेटपटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या कारवाईत पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं असून, त्यामध्ये सौरभ बिराजदार (२५, जिजामाता नगर, ता. तुळजापूर), समर्थ भोसले (21, पुजारी, शुक्रवार पेठ), समर्थ कवडे (22, तुळजापूर), विश्वजीत शिंदे (19, शुक्रवार पेठ), अमोल काळुंके (20), संतोष तळेकर (30) आणि अजय कांबळे (40, तिघेही लातूर निवासी) यांचा समावेश आहे. हे सर्वजण लॉजमध्ये उपस्थित होते.या प्रकरणात अजून तीन संशयित फरार आहेत.

त्यांची नावं किशोर तळेकर, श्याम तळेकर आणि शाहू तळेकर (सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर) अशी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.एका महिन्यापूर्वी (14 April) लातूर पोलिसांनी रिंगरोड परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकत देहव्यापाराचं रॅकेट समोर आणलं होतं. या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा लोकांवर गुन्हा दाखल केला होता.लातूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिंग रोड भागात एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी लातूर पोलिसांनी स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. आरोपींच्या चौकशीत काही महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढून अनैतिक धंद्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. यानंतर चार महिलांना अँटी ह्यूमन ट्राफिकिंग पथकाने सोडवले

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.