कामचुकार कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा; आशीष शेलारांचे मुंबई महापालिकेला निर्देश.

नागरीकांनी अपूर्ण रस्तेकामांचा पाढा वाचला. कामचुकार कंत्राटदारांवर दंड आकारण्यात यावा, असे निर्देश शेलार यांनी महापालिकेला दिले.मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र काही कंत्राटदाराकडून नियोजन होत नसल्याने कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. ही बाब बुधवारी मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांना रस्ते-काँक्रीटीकरणाच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आली. यावेळी नागरीकांनी अपूर्ण रस्तेकामांचा पाढाच वाचला. कामचुकार कंत्राटदारांवर दंड आकारण्यात यावा, असे निर्देश शेलार यांनी महापालिकेला दिले.आशीष शेलार यांनी बुधवारी पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी गेले सहा महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट-काँक्रीट टाकल्याचे निदर्शनास आले.

याबाबत स्थानिकांनी तक्रार केली. यावेळी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर उपस्थित होते. नागरिकांचा रोष पाहता, तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना शेलार यांनी केल्या.घाटकोपर पश्चिम ते विक्रोळी पार्कसाइट रस्त्यावर काही तासांपूर्वीच सिमेंट-काँक्रीट टाकण्यात आल्याचे दिसले. एस वॉर्डमधील भांडुप पश्चिम अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रीटीकरण झाल्याचे व रस्त्याची पातळीही योग्य नसल्याचे निदर्शनास आले . स्थानिकांनी याबाबत संताप व्यक्त केला . ही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या लक्षात आणून देत याबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यावर ओतणे २० मे २०२५पासून बंद करण्यात आले आहे. २० मे २०२५ नंतर रस्ते-काँक्रीटीकरणाचे कोणतेही नवे काम सुरू करू नये. सुरू असलेली सर्व कामे ३१ मे २०२५ पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत. सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण केल्यानंतर रस्त्याचा काही भाग अपूर्ण असेल , तर मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने ते काम पूर्ण करून रस्ते वाहतूकयोग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( प्रकल्प ) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.