भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले..

भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले..

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी, राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. अनेक बसमध्ये ना खिडक्या, ना व्यवस्थित दारं, तर छप्परही अक्षरशः ढासळण्याच्या स्थितीत अनेक बस रस्त्यावर धावताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात शहरातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघातातील मृतांची नावे असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (क्र MH 40, N9828) या बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली.

ही बस लासूरकडून चोपडा आगारात येत असल्याची माहिती आहे. मात्र शहरातील गजबजलेल्या भागात भरधाव ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. यात रवींद्र बहारे आणि सोनू रशीद पठाण हे दोघे ठार झाले तर या अपघातात अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोनवणे डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले. दरम्यान बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.