वडिलांच्या अंत्यविधीला जाताना मुलगी-नातवावरही काळाचा घाला, जगबुडी नदी पूल अपघातात मोरे कुटुंब हादरलं.

रत्नागिरी येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार १०० फूट खोल नदीच्या पात्रात जाऊन कोसळली. यामध्ये दोन कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आई-मुलाचा समावेश होता.वडिलांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यविधीसाठी सगळे निघाले होते. याच वेळेला वाटेतच काळाने घाला घातला. निष्ठूर नियतीने डाव साधला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मिताली मोरे यांचे वडील मोहन चाळके यांचं रविवारी (18 मे) निधन झालं. ते देवरुख येथील राहणारे होते. मोहन चाळके हे उद्धव ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते असून ते शाखाप्रमुख होते. त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी निधन झालं.

त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी हे सगळे नातेवाईक मुंबईहून निघाले होते.देवरूख करली येथील मोहन चाळके यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वडिलांच्या अंत्यविधीसाठी मिताली मोरे आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक निघाले होते. यावेळी सात जण या कारमधून प्रवास करत होते.मुंबईकडून देवरुखकडे निघालेली कार भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. ही कार 100 फूट खोल थेट नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45), निहार विवेक मोरे (19), श्रेयस राजेंद्र सावंत (23) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, हे सगळं कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालं होतं त्याचवेळेला निष्ठुर नियतीने डाव साधला आहे.हे दोन्ही कुटुंबे मुंबई मिरा रोड- भाईंदर येथून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते. आपल्या ताब्यातील किया कारने हे कुटुंब निघालं होतं. मात्र, यावेळी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून त्यांची कार थेट नदीत कोसळली आणि हा भयानक अपघात घडला. या अपघाताने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.