शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा, कार्यकर्ते फिरकेनात, खुद्द मंत्री पुढाकार घेत म्हणाले…

 भाषणादरम्यान खुद्द गुलाबराव पाटील यांनी भूत दिसल्याच्या अफवेचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांमध्ये भुताच्या अफवेने भीती पसरल्याचं सांगितलं जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. या कार्यालयाचे चार जून रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन होणार आहे, मात्र या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे आता कार्यकर्तेच कार्यालयात जायला नकार देत आहे. मात्र शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की चार जूननंतर मीच या कार्यालयात बसणार, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका.विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे कार्यालय उभारण्यात येत आहे. जवळपास पूर्णत्वास आलेल्या या इमारतीचं उद्घाटन 4 जून रोजी होणार आहे. मात्र भूत असल्याच्या चर्चेमुळे काही कार्यकर्त्यांनी या कार्यालयापासून स्वत:ला दूर ठेवले असल्याचं बोललं जातं.

विशेष म्हणजे, या चर्चेला अधिक उधाण आले ते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका भाषणामुळे. भाषणादरम्यान त्यांनी खुद्द या अफवेचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांमध्ये भुताच्या अफवेने भीती पसरल्याचं सांगितलं. तथापि, “ही अफवा असून, कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये. मी स्वतः या कार्यालयात नियमित बसणार आहे,” असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.शिवसेना कार्यालयात भूत असल्याच्या अफवेने कार्यकर्ते जात नाहीत. यामुळे येत्या 4 जून रोजी त्या कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात येणार आहे. विधानसभेनंतर प्रथमच या कार्यालयाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली मात्र कार्यालयाला भुताचे ग्रहण अफवेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागले आहे.

आता चार जूननंतर कार्यकर्ते कार्यालयात जातात किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नंदुरबारात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहादा आणि तळोद्यात युतीच्या माध्यमातून निवडणूका लढवू. परंतु, या ठिकाणी युती न झाल्यास दोन्ही नगरपालिका शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढवेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली. शहादा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्यानंतर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आमश्या पाडवी, ॲड. राम रघुवंशी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.