धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती,

धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती,

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर धरणगाव -अमळनेर तालुक्यातील धावडे येथील तापीपात्राजवळ धरणगाव शहराला पेयजलाचा पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना असून सावखेडा गावाजवळ व्हॉल्वला मोठया प्रमाणावर गळती असल्याने अक्षरक्ष : दररोज हजारो लीटर पेयजलाची नासाडी होत आहे . धावड्यापासून धरणगावपर्यंत या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकलेली असुन त्याद्वारे धरणगाव शहराला पेयजलाचा पुरवठा होत असतो .परंतू गेल्या कित्येक महीन्यांपासुन या योजनेच्या व्हॉल्वला सावखेडा गावाजवळ रा . मा . क्र .१४ला लागुनच मोठया प्रमाणावर पेयजलाची रात्रंदिवस गळती सुरू आहे .

गळतीचे पाणी जवळच असलेल्या पाटामध्ये उतरवण्यात आलेले असल्याने पाट तुडूंब भरला आहे . आता तर गेल्या महीनाभरापासून गळतीचे मोठया प्रमाणावरील पाणी रस्त्याला लागून असलेल्या गटारीद्वारे वाहत येवून बस स्टॅण्डसमोरील रहीवाशी वस्तीतील मोकळ्या प्लॉटीमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेले आहे .परीणामी बस स्टॅण्डसमोरील मोकळ्या पडलेल्या प्लाटींमध्ये सर्वदूर पाणीच पाणी साचलेले आहे . तरी देखील नगरपालीका प्रशासनाचे व्हॉल्वगळती काढण्याच्या कामाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे . यामुळे नागरीकांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे . व्हॉल्वगळती त्वरीत थांबवण्यात यावी . अशी मागणी सावखेडा ग्रामस्थांमधुन केली जात आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.