शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. पत्रा चाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सक्तवसुली संचलनालयानं अटक केली.मुंबई: शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. पत्रा चाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सक्तवसुली संचलनालयानं अटक केली. नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका झाली. तुरुंगातील दिवसातील अनुभवांवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात संपन्न होणार आहे. या पुस्तकात गृहमंत्री अमित शहांबद्दल अनेक स्फोटक दावे करण्यात आलेले आहेत.पुस्तक प्रकाशनाच्या आधी संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत आर्थर रोड तुरुंगातील दिवसांवर भाष्य केलं. तुरुंगात असताना कधी अस्वस्थ वाटलं नाही का, राजकारण सोडून निवृत्ती घ्यावी असा विचार मनात आला का, असे प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर तसा विचार मनात कधीच आला नाही. कारण मला अडकवण्यासाठी सगळं कुभांड रचण्यात आल्याची खात्री होती, असं उत्तर राऊत यांनी दिली.










