संतोष देशमुख पार्ट-2 करायचा; मदतीला लोक धावून आले म्हणून मी वाचलो, शिवराज दिवटेनं सांगितलं नेमकं काय घडलं.

 बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. शिवराज दिवटे नावाच्या तरुणाचे अपहरण करून त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेण्यात आले. तिथे त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे ‘संतोष देशमुख पार्ट टू’ करण्याची धमकी देत होते, असे दिवटेने सांगितले.केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये.

या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही तरूणांनी मिळून ही मारहाण केली. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अगोदर अपहरण केले आणि त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बांबू आणि लाकडाने मारहाण केली.

सध्या शिवराज दिवटे याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. या बेदम मारहाणीबद्दल बोलताना शिवराज दिवटे हा म्हणाला की, काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडले नसते. यासोबतच शिवराज दिवटे याने धक्कादायक खुलासा देखील केलाय. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असे म्हणत होते, असेही शिवराज दिवटेने म्हटले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.