टीआरपीसाठी धडपड, आव असा आणताहेत, जणू ते स्वातंत्र्यवीरच; नीलम गोऱ्हेंची संजय राऊतांवर टीका.

संजय राऊत यांची स्वतः बद्दल बोलून टीआरपी वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,’ असे गोहे म्हणाल्या. ‘महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती एकत्र लढणार आहे. ‘संजय राऊत असा आव आणत आहेत, जणू ते स्वातंत्रवीरच आहेत. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की मनी लाँडरिंग केल्यानंतर संजय राऊतांनी साक्षीदारांना धमकावणे आणि साक्षी पुरवाव्यात हस्तक्षेप केल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात जायची वेळ आली आहे,’ असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी केला. जालना दौऱ्यादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.’संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. मात्र, स्वतःवरील दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदारांना धमकावण्याचा आणि साक्षी पुराव्यात हस्तक्षेप केल्याने त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जायची वेळ आली आहे. राऊत यांनी पुस्तकाचे सगळं श्रेय पाटकरताईंना द्यायला पाहिजे. या पुस्तकातून टीआरपी मिळवायचा आणि स्वतःचे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे. राऊत यांच्यासोबत त्या काळात आम्ही होतो, आम्ही पण त्यांचे आत्मचरित्र लिहू शकतो. संजय राऊत यांची स्वतः बद्दल बोलून टीआरपी वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे.

हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,’ असे गोहे म्हणाल्या. ‘महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती एकत्र लढणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार होईल. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पक्ष श्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने सगळे होणार आहे,’ असेही गो-हे यांनी सांगितले. जालन्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात आपण आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा नक्कीच चर्चा करू, असेही गोन्हे या वेळी म्हणाल्या.’लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या निर्णयावर सरकार लवकरच विचार करील.

कारण, लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे. विरोधी पक्ष सातत्याने खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करीत आहे. विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला महिलांनी बळी पडू नये. महिलांना महायुती कधीच विसरणार नाही,’ असेही गोन्हे या वेळी म्हणाल्या.महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती एकत्र लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार होईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.