‘आधी तिकीट कापलं, आता तोंड कसं बंद करायचं हे…’, खासदार मेधा कुलकर्णींना भाजप नेत्याचीच धमकी?

भाजपातील दोन नेत्यांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना चक्क भाजप नेत्याच्या भावाकडून धमकीचा फोन आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून आलेला बघायला मिळत आहे.राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. असं असताना भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद उफाळल्याचं बघायला मिळत आहे. यामध्ये एका बाजूला भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेखर चरेगावकर आहेत. शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष होते. मेधा कुलकर्णी यांनी शेखर चरेगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेखर चरेगावकर यांच्यासोबतच्या वादातून त्यांचे बंधू तथा भाजपचे पदाधिकारी शार्दूल चरेगावकर यांनी आपल्याला धमकीचा फोन केल्याचा दावा देखील मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला पोहोचला आहे. शेखर चरेगावकर यांनी भाजपच्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. “यशवंत सहकारी बँकेत माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी 150 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे”, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. “ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आरबीआयच्या प्रशासकाची नियुक्ती आणि घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे”, असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं. “सहकार मंत्र्यांकडे गेलो पण काहीच कारवाई झाली नाही”, असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल चारेगावकर यांनी धमकीचे फोन केले, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना त्याच भाजप नेत्याच्या भावाने धमक्या दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.”यशवंत सहकारी बँकेच्या ठेवीदारांना तुम्ही कोणाच्या नादी लागताय? या आधी आम्ही त्यांचं तिकीट कापलं यापुढे देखील त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे आम्हाला माहीत आहे”, अशी धमकी शार्दूल चारेगावकर यांनी दिल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, “सरकारमधील लोकांकडून दबाव असल्याचं अधिकारी आम्हाला सांगत आहेत”, असंही मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे लाखो रूपये यशवंत सहकारी बँकेत ठेवले होते. मात्र, शेकडो कोटींच्या अर्थिक घोटाळ्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.