बहिणीच्या लग्नासाठी थांबला असता तर वाचला असता, लखनऊ बस अपघातात भावाचा जळून मृत्यू.

लखनऊ येथे एका स्लीपर बसला आग लागून त्यात पाच जणांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेत मधुसूदन नावाच्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. त्याच्या चुलत बहिणीचं तीन दिवसांनी लग्न होतं, मात्र तो या लग्नासाठी थांबला नाही आणि त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाला.असं म्हणतात की जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जेव्हा येतो तो आपोआप त्याच्याकडे ओढला जातो. मधुसूदनच्या बाबतीतही असंच घडलं. तीन दिवसांनी त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. घरच्यांनी त्याला लग्नानंतर दिल्लीला जाण्यास सांगितलं. पण, तो काही ऐकला नाही आणि लखनऊ बस दुर्घटनेत जळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.बिहारहून दिल्लीला जाणारी ट्रॅव्हल पॉइंट कंपनीच्या बसला लखनऊच्या रिंग रोडवर भीषण आग लागली. या अपघातात पाच प्रवासी जिवंत जळाले. मृतांमध्ये बेगूसराय जिल्ह्यातील सांख गावचा मधुसूदन साह नावाचा तरुणही आहे. मधुसूदनच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांनी एकच आक्रोश केला.

मधुसूदनच्या घरच्यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 12 वाजता ही बस बेगूसरायमधून निघाली होती. गुरुवारी सकाळी 4:40 च्या सुमारास हा अपघात झाला. मधुसूदनचा भाऊ रोशन आग्रा येथील फ्लावर मीलमध्ये काम करतो. 18 मे रोजी त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. रोशनला लग्नासाठी यायचे होते. त्यामुळे मधुसूदन त्याचे दोन मित्र रणधीर कुमार आणि रवी किशन यांच्यासोबत कामासाठी बसने आग्राला जात होता. त्याचवेळी हा अपघात झाला. मधुसूदनच्या वडिलांचे निधन 18 वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर त्याची आई लीला देवीने त्याला वाढवले. दोघे भाऊ आग्रा येथील फ्लावर मीलमध्येच काम करत होते.मधुसूदनच्या सांख गावात होणाऱ्या सरस्वती मेळ्यासाठी गावी आला होता. त्यानंतर आग्राला जाण्यासाठी त्याने ट्रॅव्हल पॉइंट कंपनीच्या बसचे दिल्लीचे 1200 रुपयांचे तिकीट काढले.

आईचा आशीर्वाद घेऊन तो बुधवारी निघाला. घरच्यांनी त्याला 18 मे रोजी होणाऱ्या चुलत बहिणीच्या लग्नापर्यंत थांबायला सांगितले होते. पण, मधुसूदनने त्यांचे ऐकले नाही आणि तो निघून गेला.मधुसूदनचे काका संजय कुमार, शेजारी वासुदेव साह आणि उपसरपंच प्रतिनिधी देवीलाल यांच्यासह गावकऱ्यांनी सांगितले की, बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. आग लागल्यानंतर त्याने बस थांबवण्याऐवजी अर्धा किलोमीटरपर्यंत चालवत नेली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याऐवजी तो स्वतः उडी मारून पळून गेला. त्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाला. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. “मृतक गरीब कुटुंबातील होता, त्याच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळाली पाहिजे,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.