बारा दिवसांवर लग्न, खरेदीवेळी इनोव्हाची जोरदार धडक, होणारी नवरी बचावली, पण…

​​फक्त बारा दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना होणारी नवरी गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण परिवार हा लवकर तिची तब्येत चांगली व्हावी या याकरता प्रयत्न करत आहेत.सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू आहे. याकरता लग्नकार्याचा दिवस येईपर्यंत खरेदी करता बाजारपेठेत जाणे लग्न घरात सुरूच असते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर येथील या युवतीचे लग्न अगदी बारा दिवसांवर लग्न येऊन ठेपले असल्याने. ती लग्नाचे सामान खरेदी करण्याकरता बाजारात गेली होती. तिथे तिच्या गाडीला इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. ज्यात ती गंभीरित्या जखमी झाली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून ती या अपघातातून बचावली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर येथील युवती गीता ज्ञानेश्वर आढाव ही लग्नाचे सामान खरेदी करून चिखलीवरून घराकडे परतत होती. तेव्हा तिच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिली.

यामुळे दुचाकीवरील युवती गंभीर जखमी होऊन एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.सदर घटना शेलू फाट्याजवळ घडली असून साधारणत: पाच वाजेच्या सुमाराची घटना घडल्याची माहिती आहे. संध्याकाळी बाजारात वर्दळ आणि त्याच वेळी मागून एक येणारी इनोव्हा कार, यादरम्यान कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या कारने युवतीच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि ती रस्त्याच्या कडेला पडली. जखमी झालेल्या तिला तात्काळ चिंचोले हॉस्पिटल चिखली येथे दाखल करण्यात आले.

मात्र, गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. तिच्यावर पुढील उपचार हे संभाजीनगर येथे सिटी केअर मध्ये सुरू असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.या अपघाताबाबत फिर्याद देवानंद विठोबा आढाव यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिली यावरून चालकाविरुद्ध 376 कलम 281 125 324 434 भादवी नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास अमरापूर पोलीस करीत आहेत. इनोवा कार क्रमांक एम एच 37 वी 88 77 या वाहनाने तरुणीला धडक दिली. वाहन चालक रॅश ड्रायव्हिंग करत होता का? याबाबत देखील तपास करणे गरजेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.