फोन आला अन् जीव गेला, मोबाईलवर बोलत उभे होते, तेवढ्यात संकट कोसळलं, मुख्याध्यापकाच्या मृत्यूने नांदेड हळहळलं.

नांदेडमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. मुख्याध्यापक रस्त्यावर फोनवर बोलत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली.मोबाईलवर बोलत थांबलेल्या एका शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. मोबाईलवर बोलत असताना अंगावर वीज पडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे. जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवारी (15 मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. संजय कृष्णकुमार पांडे (वय ५६) (रा. करंजी ता. माहूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. गुरुवारी देखील माहूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला. संजय पांडे हे दुपारी साडे तीन वाजताच्या माहुरमध्ये दुचाकीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, फोन आल्याने ते रस्त्यातच फोनवर बोलत थांबले होते. यावेळी अचानक अंगावर वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला.विदर्भातील हिवरा संगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजय पांडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. करंजी (ता. माहूर) या मुळगावी मोटारसायकलवर परत जात होते. माहूर शहरापासून २ किमी अंतरावर मालवाडा घाटात ते गाडी थांबवून फोनवर बोलत होते.

तेवढ्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि नियतीने घाला घातला. या घटनेने माहूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.तर, दुसऱ्या एका घटनेत असोली येथे शेतात भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असतांना शेतमजूर अमरसिंग चव्हाण (रा. असोली ता. माहूर) यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पांडे यांना मृत घोषित केले. जखमी शेतमजूर अमरसिंग चव्हाण यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपीन बाभळे, परिचारिका पूजा तरटे, रंजना साबळे, आरती शिंदे, परिचर शेंडे हे उपचार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.