खोलीत कोंदट वास, मोलकरणीला संशय, आत पाहताच धक्का बसला, पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीसोबत काय घडलं?

एका २७ वर्षीय तरुणीला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने तरुणीवर चाकूने वार करत नंतर स्वयंपाकघरातील गॅस पाईप तिच्या तोंडात टाकून आग लावली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.एका तरुणीसोबत गुरुवारी रात्री भयंकर घटना घडली. तरुणीवर चाकूचे वार करण्यात आले. त्यानंतर स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरचा पाईप तरुणीच्या तोंडात टाकून आग लावण्यात आली. तरुणीच्या अशा हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.२७ वर्षीय तरुणी मागील सहा महिन्यांपासून भाड्याच्या घरात एकटीच राहत होती. हत्येच्या घटनेनंतर तरुणीचा मृतदेह अंथरुणावर आढळला. खोलीत आग लागली होती, खोलीतील लाईट्स बंद होत्या. घरात आगीची घटना घडूनही याबाबत कोणालाही आजूबाजूला काहीही माहिती नव्हती.हत्येच्या घटनेनंतर तरुणीच्या घरात काम करणारी महिला आली. तिला संशय आल्याने तिने खोलीतील लाईट्स लावल्या.

त्यावेळी तरुणी भयंकर अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणात मृतावस्थेत आढळली. काम करणाऱ्या महिलेने जोरात आरडाओरड केल्यानंतर घराचे मालक आले. त्यानंतर संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच पोलीस सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.दरम्यान, तरुणी तीन बहीण-भावंडं आहेत. तरुणीचा एक भाऊ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आहे. तो ट्रेनिंग घेत आहे. तरुणी मूळची मुजफ्फरपूरची राहणारी होती. मात्र मागील सहा महिन्यांपासून ती पटणामध्ये भाड्याने राहत होती.मृत्यूआधी तरुणी सकाळी १० वाजता आपल्या आईशी बोलली होती. त्यानंतर पुन्हा कुटुंबियांनी तिला कॉल केला पण फोन बंद आला.

कुटुंबियांना ती काही कामात असेल किंवा फोनला चार्जिंग नसेल असं वाटलं आणि त्यांनी पुन्हा तिला कॉल केला नाही.आता हत्येनंतर पोलिसांनी तरुणीचा फोन ताब्यात घेतला आहे. तिने शेवटचा फोन कोणाला केला, तिच्या फोन कोणाच्या हाती लागला का? तिच्या खोलीत कोण आलेलं याचा तपास पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणीला खोलीत आलेल्या व्यक्तीकडून मारहाण झाली असावी. त्यात ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला गॅस पाईप तोंडात टाकून आग लावण्यात आली असावी. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.