जळगांव शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या बाबत राज्यपाल यांना निवेदन..

जळगांव शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या बाबत राज्यपाल यांना निवेदन..

१) जळगांव येथील प्रादेशिक परीवहन कार्यालयात प्रादेशिक परीवहन अधिकारी हे पद गेल्या ४ महिन्यांपासुन रिक्त आहे ते तातडीने भरण्यात यावे.  २) जळगांव जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त या पदाचा कारभार नाशिक, धुळे येथील अधिकारी यांच्याकडे अतिरीक्त म्हणून आहे त्याठिकाणी तातडीने कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा, ही विनंती. ३) जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत त्या तातडीने भरण्यात याव्यात. ४) राष्ट्रीय महामार्ग जळगाव शहरातुन जातो त्यामुळे दररोज अपघातांची मालीका सुरू आहे त्याकरीता “वळण रस्ता” त्वरीत करण्याचे आदेश द्यावे, ही विनंती. ५) जळगांव शहरातील एमआयडीसी ला लागुन मेहरूण, रामेश्वर कॉलनी येथील कामगारांना एमआयडीसीत जाण्याकरीता जवळचा रस्ता उपलब्ध करून द्यावा. सदर मागणी खुप जुनी आहे. ६) जळगांव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असुन केळीला फळाचा दर्जा मिळावा, ही मागणी मंजूर करण्यात यावी.

७) जिल्ह्यात कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तरी कापसाला रू. १००००/- क्विंटल भाव मिळावा. शेती माल उत्पादनाला हमी भाव योग्य प्रमाणात मिळावा. ८) जळगांव येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यात यावा जेणेकरून मोठे विमान उतरण्याची सोय होईल व पर्यटनाला चालना मिळेल (अजिंठा लेणी येथुन फक्त ६० कि.मी. आहे.) ९) कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाणे-येणेकरीता विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी, विद्यार्थ्यांचे खुप हाल होतात. १०) विद्यापिठात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह बांधण्यात यावे. ११) स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालीका, नगरपालीका, नगर परीषद, जिल्हा परिषद यांच्या निवडणूका तातडीने घेण्यात याव्यात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरीकांचे कामाचा खोळंबा होत आहे. १२) कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी पद्धत सुनियोजित करण्याची आवश्यकता आहे. एक दिवसात शिक्षकाकडून ९० उत्तरपत्रिका तपासणी पद्धत ही न्याय देणारी पद्धत नाही. यामुळे सदोष पेपर तपासणी होते व विद्यार्थ्यांला त्याचा नाहक त्रास होतो आहे. याबाबत दिशानिर्देश द्यावेत, ही विनंती.

वरील सर्व विषय लोकहिताचे, शेतकरी हिताचे व विद्यार्थी हिताचे आहेत. याबाबत आपण संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत एवढीच माफक अपेक्षा. या प्रसंगी मनसे चे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे,महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, चेतन पवार, सतिश सैदाणे, शहर सचिव जितेंद्र पाटील, जनहित कक्ष जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित कक्ष तालुका संघटक, संदीप मांडोळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, उपशहर सचिव खुशाल ठाकूर, श्रीकृष्ण मेंगळे, शहर संघटक जनहित कक्ष हे या प्रसंगी उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.