मुलाचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहून कुटुंबियांना बसला धक्का, फोनही बंद, अचानकच…पुण्यातील धक्कादायक घटना.

 पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. मूळचा बीडचा असलेला हा विद्यार्थी भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता आणि एका फेस्टिवलसाठी पुण्यात आला होता. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाइड नोट ठेवली होती. वानवडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या केलीये. या घटनेने मोठी खळबळ उडाली. विद्यार्थ्याने चक्क सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली. हा विद्यार्थी मुळ बीडच्या भाग्यनगर परिसरातील राहणारा होता. तो AIIMS भोपाळ येथे शिक्षण घेत होता आणि फेस्टिवलसाठी तो AFMC कॉलेज पुण्यात आला होता. यादरम्यानच त्याने हे टोकाचे पाऊस उचलले. धक्कादायक म्हणजे त्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत आत्महत्या केली. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय.मृत तरुणाचे नाव उत्कर्ष महादेव शिंगणे (वय २०, रा. भाग्यनगर, बीड) असे आहे. तो वैद्यकीय शिक्षण भोपाळला घेत होता.

आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर सुसाइड नोट ठेवली आणि सार्वजनिक शौचालयात स्वतःचा गळा चाकूने कापून जीवन संपवलं. ही घटना पुण्यातील वानवडी भागात ८ मे रोजी घडली असून, वानवडी पोलीस तपास करत आहेत.फेस्टिवलसाठी तो पुण्यात आला होता आणि कार्यक्रमानंतर तो रात्री कॉलेजमध्येच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा फोन बंद लागत होता. कुटुंबियांनी नियंत्रण कक्षाला संपर्क साधत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आणि त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर आत्महत्येचा उल्लेख केला असल्याची माहिती दिली. त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहून त्याच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला.

उत्कर्षचा शोध घेतला असता कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमधील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. तो कमोडवर बसलेल्या अवस्थेत आढळून आला, शेजारीच रक्त आणि चाकू पडलेला होता. चाकू त्याने ऑनलाइन अ‍ॅपवरून मागवलेला असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असून घटनास्थळी पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.