मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.

त्यावरुन  बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकातील पोह संदिप पाटील व प्रविण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की, दिपक सुमाऱ्या वारेला रा.कर्जाणा ता. चोपडा हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे दोन दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. परंतु वर नमुद पथकातील अमंलदार देखील तिथेच ठाणमांडून होते. दिनांक ०८/०९/२०२४ रोजी दिपक सुमाऱ्या बारेला हा त्याचे घरी कर्जाणा येथे आला असून तो दुपारून गावातून पळून जाण्याचा मार्गावर असतांना वर नमुद पथकाने कर्जाणा गावाचे बाहेर मेलाणे गावाजवळ त्यास शिताफिने पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव असे सांगुन त्याचे जवळचे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे जवळची युनीकॉर्न मोटार सायकल ही पाचोरा येथून चोरी केल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यास अजुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने १) पाचोरा पो.स्टे. CCTNS NO ३९२/२०२४ भान्यासं ३०३(२), २) पाचोरा पो.स्टे. CCTNS NO ३९३/२०२४ भान्यासं ३०३ (२), ३) पारोळा पो.स्टे. CCTNS NO २८०/२०२४ भान्यासं ३०३ (२), ४) मोहाडी ता.जि.धुळे पो.स्टे. CCTNS NO ५५/२०२१ भादवि ३७९ तसेच इतर २ मोटार सायकल धरणगाव व राजपुर जि. बडवाणी येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव याचे कडून जप्त केलेल्या ६ मोटार सायकल सह वैद्यकिय तपासणी करून पुढील तपासकामी पाचोरा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव,  कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.