खळबळजनक! पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ भंगाराच्या दुकानात आढळले बॉम्ब शेल, नागरिकांमध्ये दहशत, बॉम्ब नाशक पथक दाखल.

पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही बॉम्ब शेल आढळली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा तणाव वाढत असताना, पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. 9 ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुने बॉम्ब शेल आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने कारवाई करत बॉम्ब शेल ताब्यात घेतले आहेत.याबाबत पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही बॉम्ब शेल आढळली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने कसून तपासणी करून दोन्ही बॉम्ब शेल ताब्यात घेतले. हे बॉम्ब शेल जुने असून, त्यांची तीव्रता कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही, खबरदारी म्हणून ते संरक्षण दलाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी भंगार दुकानाच्या मालकाची चौकशी सुरू केली असून, बॉम्ब शेल कुठून आले याचा तपास सुरू आहे. सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत अशा घटना नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याने, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिसांकंडून केला जातं आहे.दुसरीकडे, पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागात हल्ले करण्यात येत आहेत. परंतु भारतीय सैन्य पाकिस्तानचे सर्व हल्ले फोल ठरवत आहे. पाकिस्तानने प्रक्षेपीत केलेल्या क्षेपणस्त्रांचे अवशेष राजस्थान, गुजरात आणि सीमा भागात मिळाले आहेत. पाकिस्तान सतत सीमा भागात ड्रोनच्या सहाय्याने हल्ले करत आहे. भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या बऱ्याच हवाई तळांचे नुकसान केले आहे. पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरही जोरदार स्फोट घडवण्यात आला आहे. सरगोधा हवाईतळाचं स्फोटात मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.