पुण्यात 19 वर्षीय तरुणीची पाकिस्तान समर्थनात इन्स्टा पोस्ट, पोलिसांनी जिरवली, कोंढव्यात बेड्या.

 पुण्यातील कोंढवा परिसरात परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तान समर्थनात पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, सोशल मीडियावर आता भारतात राहून पाकिस्तानची भलामण करणाऱ्या समर्थकांची उदाहरणं पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने अशाच प्रकारची पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिची खोड मोडली आणि बेड्या ठोकल्या आहेत.पाकिस्तानच्या बाजूने नारे देणारी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाली होती.

या प्रकरणी संबंधित तरुणीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196, 197, 299, 352, 353 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खतीजा शहाबुद्दीन शेख (वय 19) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली आहे.सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवतीने सोशल मीडिया अकाउंटवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा स्वरुपाची पोस्ट केल्याने खळबळ उडाली होती. तिला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आहे. तिच्या विरोधात राष्ट्रद्रोहासारख्या गंभीर कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर द्वेषपूर्ण किंवा देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी यावेळी दिला आहे.सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तिला अटक देखील करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती झोन चारचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.